वृत्तसंस्था/ शेन्झेन
भारताची अव्वल पुऊष दुहेरी जोडी सात्विकराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांना रविवारी येथे झालेल्या ‘चायना मास्टर्स सुपर 750’च्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोरियाच्या किम वोन हो आणि सेओ सेउंग जे यांच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
आशियाई क्रीडास्पर्धेतील विजेत्यांनी त्यांचा जेतेपदाचा दुष्काळ यावेळी संपवण्याची आशा केली होती. परंतु पहिल्या गेममध्ये त्यांनी 14-7 अशी आघाडी गमावली आणि 45 मिनिटांत त्यांना 19-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. सात्विक आणि चिराग सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर आणि हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर मागील आठवडाभरात एकही गेम गमावला नव्हता.
परंतु त्यांना सुऊवातीचा गेम वर्चस्व गाजविल्यानंतर देखील हातून गमावल्याबद्दल पश्चात्ताप होईल. दुसरीकडे, इतर भागीदारांसोबत प्रयोग केल्यानंतर या हंगामात पुन्हा एकत्र आलेले किम आणि सिओ हे यंदा नवव्या अंतिम फेरीत खेळत होते. त्यांनी पॅरिसमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक आणि ऑल इंग्लंड आणि इंडोनेशिया ओपनमध्ये सुपर 1000 मुकुट यासह सहा विजेतेपदे जिंकली आहेत. जगातील सर्वोत्तम आक्रमण आणि सर्वोत्तम बचाव यांच्यातील लढाई म्हणून या सामन्याकडे पाहिले गेले होते आणि त्यात काही चुरशीचे क्षणही पाहायला मिळाले. पण शेवटी किम आणि सिओने विजय मिळवताना चांगले तांत्रिक कौशल्य दाखवले.
सुऊवातीला कोरियन खेळाडूंनी 3-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु भारतीय खेळाडूंनी अँगल स्मॅशच्या फटक्यांची मालिका लावत पुनरागमन केले आणि 6-6 अशी बरोबरी साधली. चिरागच्या जाळ्याजवळ कुशल स्पर्शामुळे त्यांना ब्रेकच्या वेळी 11-7 अशी आघाडी मिळाली आणि लवकरच त्यांनी ती 14-8 अशी वाढवली. तथापि, त्यानंतर चुका सुरू झाल्या आणि एका गमावलेल्या ‘व्हिडिओ चॅलेंज’नंतर त्यांची लय बिघडली. कोरियन खेळाडूंनी पुढील नऊ गुणांपैकी आठ गुण जिंकले आणि 15-15 अशी बरोबरी साधली. पुढे चिरागच्या एका चुकीमुळे कोरियाने 19-17 अशी आघाडी घेतली, परंतु सेओच्या चुकीच्या जोरावर भारतीयांनी परतफेड करत गेम 19-19 अशी बरोबरीत आणली. पण डावखुऱ्या किमने एका जोरदार फटक्यासह गेम पॉइंट मिळवला आणि चिरागने शटल बाहेर फटकावत कोरियन संघाला पहिला गेम जिंकून दिला.
बाजू बदलल्यानंतर भारतीय संघ 3-2 ने आघाडीवर होता. पुढे 4-4 अशा बरोबरीनंतर भारतीय संघाने कोरियन बचावाला भेदताना 8-6 अशी आघाडी घेतली. तथापि त्यांनी कोरियन संघाला 9-9 अशी आघाडी साधू दिली आणि नंतर सेओच्या क्रॉस-कोर्ट बचावात्मक परतीच्या फटक्याने त्यांना 10-9 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कोरियन संघाने आधी 15-11 व नंतर 18-15 अशी वाढवली. पाच मॅच पॉइंट मिळविणाऱ्या कोरियन जोडीने ही घोडदौड कायम ठेवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.









