58 वर्षांनंतर भारताला आशिया बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक
वृत्तसंस्था/ दुबई
भारताची दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रनकीरे•ाr व चिराग शेट्टी यांनी 58 वर्षांचा जेतेदाचा दुष्काळ संपुष्टात आणत आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळवून दिले. 58 वर्षांपूर्वी दिनेश खन्नाने पदक मिळविल्यानंतर भारताला मिळालेले या स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद आहे.
2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱ्या सात्विकसाईराज व चिराग यांनी पिछाडीवर पडल्यानंतरही सनसनाटी विजय मिळविताना अतिशय चुरशीच्या अंतिम लढतीत मलेशियाच्या आँग यू सिन व तेओ ई यी यांच्यावर 16-21, 21-17, 21-19 अशी मात केली. 1965 मध्ये लखनौत झालेल्या स्पर्धेत भारताच्या दिनेश खन्नाने थायलंडच्या सनगॉब रत्तानुसॉर्नचा पराभव करून एकेरीचे सुवर्णपदक मिळविले होते. पुरुष दुहेरीत यापूर्वी 1971 मध्ये भारताने कांस्यपदक मिळवित सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावर्षी दिपू घोष व रमन घोष यांनी हे पदक मिळविले होते.









