सातार्डा / वार्ताहर
सातोसे येथील श्रीदेवी माऊली मातेचा वर्धापन दिन सोमवार 15 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून लघु रुद्र व अभिषेक ,दुपारी १ वाजता आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता महिलांचा फुगडी कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता ग्रामस्थांचे भजन , ७ वाजता पालखी प्रदक्षिणा व दीपोत्सव, रात्री १० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटयमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समितीचे स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष वसंत धुरी व ग्रामस्थांनी केले आहे.









