पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली विधानसभा मतदार संघातून आम्ही चौघेजण इच्छुक होतो. तसेच मी सावंतवाडीतूनही इच्छुक होतो. मात्र तेथे राजन तेली यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मी तुर्त थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेल्या जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यापैकी ज्या उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याचा प्रचार करण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करणार असून येत्या दोन दिवसात पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.









