वार्ताहर /कडोली
य् ामकनमर्डी विधानसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश लक्ष्मण जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करून कडोली परिसर दणाणून सोडला. प्रचार रॅलीत दुचाकी मोटारसायकलीसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचाराचा धडाका संपूर्ण कडोली परिसरातील मराठी भाषिक क्षेत्रात सुरू असून कार्यकर्ते रात्रंदिवस झटताना दिसत आहेत. आमदारांनी केलेली विकासकामे जनतेला पटवून देण्याचे काम कार्यकर्ते करीत आहेत. सध्यातरी कडोली परिसरात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी कडोली परिसरातील कडोली, अगसगा, हंदिगनूर, केदनूर, बंबरगा या पाच ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व खेडेगावातून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रचार रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन सतीश जारकीहोळी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. सदर मोटारसायकल रॅली अलतगा गावातून सुरुवात करण्यात आली. ही रॅली अगसगा, हंदिगनूर, केदनूर, बंबरगा ग्राम पंचायत क्षेत्र फिरून शेवटी कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात नेण्यात आली. रॅलीत काँग्रेसचे युवा नेता राहुल जारकीहोळीसह परिसरातील ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. ठिकठिकाणी गावात रॅलीवर पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत करण्यात आल









