बेळगाव : सतीश जारकीहोळी फाउंडेशन आयेजित 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी येथील महावीर भवन येथे सतीश जारकीहोली खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा असल्याने विविध राज्यांतील स्पर्धक सहभागी होत असल्याची महिती इम्रान थापाकिरा यांनी दिली. सोमवारी येथील पर्यटन केंद्रात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुलांनाही याचा खूप फायदा झाला आहे. यावषी 25 ऑक्टोबरपासून दोन दिवस ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांना जेवण आणि निवासाची सुविधा देण्यात आली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवासह विविध राज्यांतील स्पर्धकाना निमंत्रित करण्यात आले आहे.
खासदार प्रियंका जारकीहोळी डॉ. गिरीश सोनावलकर आणि युवा नेते राहुल जारकीहोळी हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनासाठी मदत आणि सहकार्य केले आहे. सतीश जारकीहोळी यांच्या आशीर्वादाने गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. हजारो स्पर्धकांनी यात भाग घेतला आहे. या भव्य स्पर्धेत एकूण 4 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून पहिले बक्षीस 1 लाख रुपये, चषक, दुसरे बक्षीस 50 हजार रुपये, चषक, आणि तिसरे बक्षीस रु. 25 हजार रुपये, चषक. उर्वरित स्पर्धकांना समान रक्कमेची बक्षिसे दिली जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी निलेश भंडारी, जाहिद वंटमुरी, व्हिक्मकी सिंग, दिलावर पंडारी, कादिर शेख, आकाश मडीवाल आणि इतर उपस्थित होते.









