वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली पोलीस दलाला नवे आयुक्त मिळाले आहेत. सतीश गोलचा यांची दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. आतापर्यंत पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे एसबीके सिंग यांना या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश गोलचा दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. ते सध्या दिल्लीचे डीजी (कारागृह) म्हणून कार्यरत होते. गोलचा यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून प्रभावी होईल आणि पुढील आदेशापर्यंत सुरू राहील.









