वृत्तसंस्था/ लागोस (नायझेरिया)
विश्व टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत भारताच्या जी. साथियान आणि आकाश पाल यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविताना फ्रान्सच्या नॉडरेस्ट आणि ज्युलेश रोलँड यांचा अंतिम सामन्यात पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या नॉडरेस्ट आणि रोलँड यांचा 11-9, 11-4, 11-9 अशा सेट्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. मात्र महिला एकेरीत जपानच्या होनोका हेशिमोटोने भारताच्या श्रीजा अकुलाचा 11-7, 11-3, 11-4, 9-11, 13-11 अशा गेम्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने आपल्या सर्व्हिसवर 19 गुण तर प्रतिस्पर्ध्यांच्या सर्व्हिसवर आणखी 14 गुण पटकाविले होते.









