कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री राजाराम साखर कारखाना निवडणूक रंगतदार स्थितीत पोहचली आहे. यातच वेगळं राजकीय ट्विस्ट समोर आलं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना राजाराम साखर कारखाना निवडणूक लढणार नाही अशा शब्द दिला होता,अस जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी म्हटलं आहे. विनय कोरे याच्या या वक्तव्यानंतर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील याच्यावर जोरावर टीका केलीय. सतेज पाटील हे नैतिकता नसणारे नेते आहेत, त्यांना कोल्हापूरकर योग्य उत्तर देतील अस वक्तव्य केलय. विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे याची सतेज पाटील आणि संजय पाटील यांच्या सोबत बैठक झाली होती, त्या बैठकीत सतेज पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नाही अस देखील महाडिक यांनी म्हटलंय आहे.
Previous Articleअजित पवार यांच्याबाबतच्या चर्चा केवळ तुमच्या मनात, आमच्या मनात नाही; शरद पवारांचे स्पष्टीकरण
Next Article महाराष्ट्राचे वातावरण तापणार









