Satej Patil News : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे. या निर्णया विरोधात गेल्याने राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी उच्च न्यायालयात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारण 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, प्रादेशिक साखर आयुक्तांच्या मध्यरात्रीच्या आदेशावर आज सतेज पाटलांनी हल्लाबोल केला आहे. मध्यरात्री आपात्रतेची नोटीस काढली जाते, यावरून महाडिक भ्याले अशी टीका महाडिकांवर केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या दबावाने शासकीय आयुक्तांनी मध्यरात्री निकाल दिला आहे. पण आम्ही लढा बंद नाही केलेला. हा
हा लढा सुरूच राहणार, आमचे अजून 50 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली. तसेच जाणूनबुजून सभासदांचे ऊस तोडले नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाडिक भ्याले म्हणून षडयंत्र रचून आमचे २९ उमेदवार अपात्र ठरवण्यासाठी ते जंग जंग पछाडत आहेत.पण आमच्याकडे सर्व गटात उमेदवार आहेत ,त्यामुळे लढाई होणार . २८ वर्षात ज्यांनी सभासदांना जुमानले नाही, ते महाडिक आता सभासदांच्या दारोदारी फिरत आहेत.सभासदांच्यात उठाव आहे ,त्यामुळे राजाराम मध्ये परिवर्तन अटळ असल्याचेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









