प्रतिनिधी,कोल्हापूर
Rajaram Suger Factory Election 2023 : शिरोलीपासून छत्रपती राजाराम कारखाना हकेच्या आंतरावर आहे, तरीही ऊस तोडीसाठी शिरोलीकरांना महाडिकांचा उंबरा झिजवावा लागतो,हि बाब दुर्देवी असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रु आणणाऱ्या महाडिकांना कारखान्याच्या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पेले.छत्रपती राजाराम कारखाना निवडणुक प्रचारार्थ मंगळवारी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीची पुलाची शिरोली येथे बैठक झाली. यामध्ये सभासदांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, शिरोलीपासून राजाराम कारखाना लांब नाही,मात्र तरीही बहुतांश सभासदांच्या ऊसाची तोड लवकर केली जात नाही. अशा सभासदांना ऊस तोडीसाठी महाडिकांचे उंबरे झिजवावे लागतात. हेलपाटे मारुनही शेतकऱ्यांच्या भावनांची कदर नसणाऱ्या महाडिकांना निवडणुकीत धडा शिकवा,असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. आमदार राजूबाबा आवळे यांनी हि आरपारची लढाई असून यामध्ये परिवर्तन आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे म्हणाले,हाकेच्या आंतरावर कारखाना असूनही सभासदांच्या उसाला पाच सहा महिने उशिरा तोड दिली जाते. उसतोडीसाठी शिरोलीकरांची अशी फरफट का केली जाते? असा सवाल उपस्थित केला. माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी गोकुळ असो कि राजाराम कारखाना प्रत्येक निवडणुकीत महाडीक कुटुंबातील उमेदवार देतात.आमदार सतेज पाटील यांनी मात्र प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य सभासदांना उमेदवारी दिली आहे, या निवडणुकीतही आमदार पाटील यांना बळ द्यावे, असे आवाहन केले.
माजी सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, महाडिक स्वत:ला शिरोलीचे म्हणतात, मग शिरोलीत त्यांनी राजाराम कारखान्याचे नवीन सभासद का केले नाहीत. महाडिकांच्या गलथान कारभारामुळे शिरोलीतील सभासदांना आपला ऊस पेटवून कारखान्याला घालण्याची वेळ आली आहे. पाच हजार रुपये दिल्याशिवाय तोडणी मिळत नसल्याचा आरोप खवरे यांनी केला. माजी संचालक बी. टी. देशमुख यांनी पुलाची शिरोलीत राजाराम कारखान्याचे 900 सभासद असून त्यापैकी 300 सभासद येलुरचे आहेत. बोगस सभासद करणाऱ्या महाडीकांना शिरोलीतील स्थानिक सभासद धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, बाजीराव सातपुते शिवाजी पोवार, राजकुमार पाटील, बाजीराव जाधव, उत्तम पाटील, पृथ्वीराज पाटील, भगवान पाटील, शक्ती यादव, ज्योतीराम पोर्लेकर, राजू सुतार, अल्लाउद्दीन मुल्ला, सरदार मुल्ला, मोहसीन देसाई, मेहुद्दीन मुल्ला, जमीन मुल्ला, जुबेर मुल्ला, अमीर मुल्ला, हरून मोमीन आदी उपस्थित होते.
Previous Articleमहिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल
Next Article करवीर निवासिनी अंबाबाईचा उद्या रथोत्सव









