Satej Patil Birthday : माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आज वाढदिवसाच्या निमित्ताने राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. वाढदिनी दुर्गम भागातील पन्नास घरावर सौरऊर्जा प्रकल्प देखील लावण्यात आला. राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना समृद्धी मिळावी,सामान्य माणसाला आधार मिळून रोजगार मिळावा अशी अंबाबाई चरणी प्रार्थना सतेज पाटील यांनी केली. तसेच राजाराम कारखान्याचा निकाल आमच्या बाजूने लागणार असा आत्मविश्वास असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. आज कोल्हापुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .
यावेळी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथून महाविकास आघाडीच्या सभेला सुरवात झाली. कोल्हापुरात 28 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा गांधी मैदानात होणार आहे. राजाराम कारखाना व मार्केट कमिटीची निवडणूक संपल्यानंतर सभेची तयारी करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, गेल्या वर्षाभारत भाजप आणि जनता दलातील एकूण 22 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार येईल असा दावा ही आमदार सतेज पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज काल न्यायालयाने फेटाळला याविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, मुश्रीफ यांच्यासाठी न्यायालयीन लढाई सर्व स्तरावर लढू.राजकारणातून अशी कारवाई व्हावी हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. सामान्यांचा श्रावणबाळ म्हणून त्यांना न्याय देण्याची भूमिका मुश्रीफ यांची आहे.असा माणूस अडचणीत येणे म्हणून सामाजिक दुर्दैव आणि चुकीचे ते लवकरच यातून बाहेर पडतील असेही ते म्हणाले.
शरद पवार यांना गेल्या दहा वर्षात कोण कोण भेटायला गेलं हे चॅनेल नी दाखवलंय.त्यांचा अनुभव मोठा आहे.
भेटायला जाण्यात गैर नाही.भाजप नेते ही त्यांना भेटायला गेल्याचे फोटो असल्याचे त्यांनी सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









