Satej Patil On Dhananjay Mahadik : जिल्ह्यात काही विकास कामांना स्थगिती आणली जातीय. जिल्ह्यात पहिलं 10 कोटीचे इनडोअर स्टेडियम मंजूर झालं. पण त्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती आणली असा संशय आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी त्यांचा खुलासा करनं अपेक्षित आहे. हवे तर राज्यसरकारने आणखी 10 कोटी द्यावेत, पण हे स्टेडीयम रद्द करण्याच पाप करू नये. हा खेळाडूंच्यावर अन्याय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,शरद पवार 25 ऑगष्टला कोल्हापुरात दौऱ्यानिमित्त आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच स्वागत करण्यात येणार आहे. पहिल्यापासून कोल्हापूरकरांचे ऋणानुबंध पवार यांच्यासोबत राहिलेत. लोकसभेची तयारी तिन्हीही पक्ष करत आहेत. उमेदवारीवर मुंबईतील बैठकीत ठरेल.कोल्हापुरात पुरोगामी विचारांचा उमेदवार निवडून यावा अशी आमची इच्छा आहे. त्यावर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. मात्र श्रीमंत शाहू महाराजांची काय इच्छा आहे ते पाहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया लोकसभा निवडणूकीवरून दिली.
बागलकोट या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला.त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्याठिकाणी नगरपरिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे.भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवले तर त्यांची चार बोटे तुमच्याकडे आहेत लक्षात ठेवा असा सज्जड दमही सतेज पाटील यांनी दिला.
महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कधी काय होईल काय सांगता येत नाही.दुर्दैवाने हे वातावरण तयार झालेलं आहे. याचा परिणाम प्रशासनावर आहे.सरकारच्या योजना तळागाळात पोहचत नाहीत. पूर्वी महाविकास आघाडीवर टीका करत होते. मात्र आता त्यांच्याचं सत्तेत तीन पक्ष आहेत. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या विकासात होत असल्याचेही सतेज पाटील म्हणाले.








