सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात म्हसवड येथील पाणवण गावात भर चौकात महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकिस आली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात महिलेने आणि तिच्या मुलाने तक्रार दिल्याने 4 जणांविरोधात कलम 354, 324 आणि ॲट्रॉसिटी नुसार 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच दोन जणांना अटक करण्यात आली. अजून दोन आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे..
Previous Articleकळंबा कारागृहातून आता थेट अमेरीका, ब्राझीलशी संपर्क
Next Article शास्त्रीनगरमध्ये आला ‘कोल्हा’ …









