सर्वात उंच झेंडा उभारण्यात येणार : ट्रक्टरच्या सहाय्याने काढल्या झाडांच्या फांद्या
प्रतिनिधी/सातारा
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रत्येक शासकीय कार्यालय, घराच्यासमोर भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने झेंडे लावण्यात येणार आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही जिल्ह्यातील सर्वात मोठा झेंडा लावण्यात येणार आहे. हा झेंडा लावण्याकरता तीन वर्षापूर्वी केलेले लॉन खराब करुन व चांगली जुनी झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी घेवून तोडली गेली आहेत.
सातारा जिल्ह्यात प्रत्येक शासकीय कार्यालयाच्यासमोर व प्रत्येक नागरिकांच्या घरासमोर झेंडा उभारण्यात यावा याकरता शासन पातळीवर आदेश दिले गेले आहेत. शासकीय कार्यालयाच्यावतीने सर्व नियोजन करण्यात आले आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वात उंच असा ध्वज उभा करण्यात येणार आहे. त्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोठी असणारी जुनी झाडे परवानगी घेवून तोडण्यात आली आहेत. त्या झाडांच्या समोरच गवताचे लॉन करण्यात आले होते.









