उंडाळे / प्रतिनिधी
सिल्व्हर ओकवरील एसटी आंदोलनात सहभाग घेतल्याने अटक झालेल्या कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर यांचं निधन झाले. कराड तालुक्यातील येवती हे त्यांचे गाव असुन सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या आठ दिवस तुरुंगात होत्या. जामिनावर सुटका झाल्यापासून त्या आजारी होत्या. त्यातच प्रकृती खालावल्याने येवती येथे घरीच त्यांचं निधन झालं.
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याच्या मान सुषमा नारकर यांनी मिळवला होता. सुषमा नारकर या २००० मध्ये कराड एसटी आगारात वाहक म्हणून दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे २२ वर्षे त्यांनी वाहक म्हणून एसटीमध्ये सेवा दिली होती.