शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य सुरू, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल, युवक पडल्याचे कारण अस्पष्ट
प्रतिनिधी/सातारा
कास पठार जवळ असणाऱ्या गणेश खिंडीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक २६ वर्षीय युवक पडला. यांची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तालुका पोलिसांना यांची माहिती दिली. तसेच शिवेंद्रराजे ट्रेकर्स रेस्क्यू टीमला ही याची माहिती देण्यात आली. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होताच बचाव कार्य सुरू केले. तो सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रसाद कडतारे (रा. अतित) असे त्या युवकाचे नाव आहे. तो कसा पडला अद्याप याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
कास पठार नजीक असणाऱ्या गणेश खिंडीत मंगळवारी अतित गावचा रहिवाशी प्रसाद कडतारे पडला. यांची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांना घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर तालुका पोलिसांना यांची माहिती दिली. शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. युवकाचे प्राण वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमने प्रयत्न सुरू केले. रात्र होवू लागल्याने बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला. तो पर्यंत गणेश खिंड परिसरात लोकांनी गर्दी केली होती. प्रसाद हा रेस्क्यू टीमला सापडला. तो सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तो जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले जाणार आहे. तो कसा पडला यांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील चौकशीत ते समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.








