सातारा,प्रतिनिधी
सातारा पोलीस दलाची पोलीस कवायत मैदान येथे 145 जागांसाठी मैदानी चाचणी पार पडली. त्या चाचणीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबाबतच्या काही तक्रारी व समस्या असल्यास सातारा पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याची दि.16 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेले आहे.
सातारा पोलीस दलाची पोलीस कवायत मैदानावर दिनांक चार ते दिनांक 8 या दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया पार पडली तब्बल नोंदणी करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी 5127 जणांचे शारीरिक व मैदानी चाचणीचे गुणपत्रक सातारा पोलीस दलाच्या वेबसाईटवर आणि पोलीस कवायत मैदान येथे जाहीर करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांना काही प्रश्न समस्या असल्यास त्यांनी दिनांक 16 पर्यंत सातारा पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









