Kolhapur : सातारा कोरेगाव मार्गावर रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने साताऱ्यावरुन सकाळी 5.30 ला सुटणारी डेमू गाडी नं. 1541 बंद केली होती, पण प्रवाशांच्या मागणीमुळे व खा. धैर्यशील माने यांनी डीआरएमना तातडीने पत्र देऊन केलेल्या सूचनेमुळे गुरुवार 16 पासूनही पॅसेंजरगाडी मिरजेतून कोल्हापूरसाठी नेहमीच्या वेळेप्रमाणे सोडण्यात येणार.ही पॅसेंजरगाडी महिनाभर म्हणजे 15 मार्च पर्यतबंद होती.आता ती पूर्विच्याच वेळेला मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज अशी धावणार आहे.
तरुण भारत संवादने उठवला होता आवाज
तरुण भारत संवादने यासंदर्भात रेल्वे प्रशासनच्या नाकर्तेपणावर आवाज उठवला होता. बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या मिरजेतून सोडण्याची प्रवाशांची मागणी लावून धरली होती. त्यास यश आले.
Previous Article‘कुंभी’ चौथ्यांदा चंद्रदीप नरकेंचाच, विरोधी बचाव मंचचा धुव्वा
Next Article महापालिका आकृतीबंधने संपवणार अनुकंपाधारकांचा वनवास ?









