कोकरूड वार्ताहर
येळापूर ता. शिराळा येथे कराडकडे जाणाऱ्या जीपची धडक लागून दुहेरी अपघातात एक गंभीर, एक जखमी झाला असून जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा गुन्हा कोकरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्याकडून व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पाटण येथील आशिष अशोक पवार ( वय- 32) हा आपल्या महिंद्रा कंपनीच्या कमांडर जीप क्रमांक एम. एच.11 ई 14 23 मधून पाटणकडे जात असताना, येळापूर येथील विमा केंद्र, इमारती समोर, समोरून आलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच. 09 सी. वाय. 63 96 व दुसरी दुचाकी एम.एच.० ९ डी. टी.88 79 वरील दुचाकी स्वारांना धडक दिली. यामध्ये मलकापूर जिल्हा कोल्हापूर येथील निशिकांत शिरगावकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले असून दुचाकीस्वारांना धडक देणाऱ्या जीपचालकास कोकरूड पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास स.पो.नी. ज्ञानदेव वाघ हे करीत आहेत.








