प्रतिनिधी / सातारा :
सातारा पालिकेची (satara municipality) कमराबंद प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजित बापट (abhijeet bapat) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत तब्बल 150 विषयांना मंजुरी देण्यात आली. 60 व्या क्रमांकाच्या अभय योजनेच्या विषयाला ब्रेक देण्यात आला. अकरा विषयांना खर्चाचा आकडाच नमूद करण्यात आला नव्हता. वसुली विभागात कार्यालयीन सहाय्यक घेण्यात येणार आहे. जे थकबाकीदार आहेत त्यांच्या मिळकतीवर बोजा चढवण्यात येणार आहे. शहरातील 11 रस्ते, 5 शौचालय आणि 7 गटरच्या कामास करिता 3 कोटी 19 लाख 81 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. शहरातील ट्रफिक सिग्नलच्या मेंटेनेस करता प्रति महिना सहा हजार रुपये पालिका खर्च करणार आहे. तसेच मजूर पुरवण्याच्या कामाकरता लाखो रुपयांची मंजुरी या सभेत देण्यात आले आहे.
सातारा पालिकेची प्रशासकीय सभा स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेत अजेंड्यावर 151 विषय होते. त्यापैकी 20 ते 21 विषय हे ठेकेदारांनी यांच्या कामांना मंजुरी देण्याचे होते, तर अकरा रस्त्यांसाठी 2 कोटी 27 लाख 56 हजार 519 रुपयांची तरतूद करून त्या कामास मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यात आला होता तसेच 5 ठिकाणी शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता 47 लाख 16 हजार 381 रुपयांची तर करून त्यास मान्यता देण्यात आली. तसेच पाईप ड्रेन व गटरच्या 7 कामांना 45 लाख 8 हजार 372 रुपयांची खर्चास मंजुरी देण्यात आली तर 11 विषय हे रस्ते व इतर कामांकरता विषय पत्रिका वर होते. त्यास मंजुरी देण्यात आली. परंतु त्यामध्ये खर्चाचा आकडय़ाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. दरम्यान काही महत्त्वपूर्ण ही निर्णय या सभेत घेण्यात आले. त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचायांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
या सभेला अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, मुख्य अभियंता दिलीप छिद्रे, मुख्य लेखाधिकारी आरती नांगरे, हिंमत पाटील, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.









