आर. टी. ओ. चौकातील घटना, एकावर गुन्हा दाखल
सातारा: शहरातील आर. टी. ओ. चौकात दुचाकी वाहनांचा किरकोळ अपघात झाला. यानंतर एका वकिलाला मारहाण करण्यात आली. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी वकील संतोष दत्तात्रय भोसले (वय ५० रा. संतनगरी, दरे बुद्रुक, आंबेदरे, ता. सातारा) हे कामानिमित्त आरटीओ चौकातून जात होते. त्यावेळी अचानक दुचाकी समोर आल्याने त्यांनी ब्रेक मारल्याने अपघात झाला आणि समोरून येणारा दुचाकीस्वार खाली पडला. अपघात झाल्यानंतर चौकात गर्दी झाली.
त्यातील कृष्णात तुकाराम नवघणे (रा. बासोळे) याने संतोष भोसले सोबत गाडीचे नुकसान झालंय नुकसान भरपाई दे अस म्हणत वाद घालत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.








