धरणातून ३० हजार १०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू राहणार; धरणात ९२.५९ टीएमसी पाणीसाठा; कोयना ,कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असू गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात ३.६२ टीएमसी इतक्या पाण्याची वाढ झाली असून धरण ८८ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात अद्याप ही पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने आता येत्या तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज रविवार दिनांक १४ रोजी सकाळी दहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवरून साडे चार फूट उचलून कोयना नदीपात्रात ३० हजार १०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला आहे.त्यामुळे कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.








