प्रतिनिधी,सातारा
सातारा शहरातील राजपथावर असलेल्या राजपुरोहित या मिठाईच्या दुकानातील किचनमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती सातारा नगरपालिका अग्निशामक दलास कळताच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यामुळे अनर्थ टळला अन् होणारे नुकसान टळले.
सातारा शहरातील कन्या शाळेच्या समोरच राजपुरोहित स्वीट्स हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानात दुपारी दीड वाजता किचनच्या चिमणीतून भडका उडून आग लागली. ही आग लागल्याची माहिती तात्काळ कामगारांनी सातारा पालिकेच्या अग्निशामक दलास दिली. अग्निशामक दलाचा बंब लगेच घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी किचनमध्ये पाणी मारुन ही आग आटोक्यात आणली. ही आग विझवण्यासाठी दोन अग्निशामक दलाचे बंब लागल्याची माहिती अग्निशामक अधिकारी प्रशांत निकम यांनी दिली. दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे राजपुरोहित स्वीट्सचे मालक कन्हैलाल राजपुरोहित यांनी सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









