गणेशोत्सवाच्या धामधुमीत शाहुपूरी, सातारा शहर पोलिसांसमोर नवे आव्हान
सातारा: भाजीपाला तसेच मिठाई खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात चोरीला गेल्याची घटना दि. 31 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. तब्बल सात जणांचे मोबाईल चोरीला दोन ठिकाणाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शाहुपूरी आणि सातारा शहर पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मोबाईल चोरटे सक्रीय झाले आहेत काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. त्या चोरट्याने दि. 31 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बसस्थानकाच्या समोरची भाजी मंडई आणि जुना मोटर स्टॅड तसेच मोती चौक येथे मोबाईल चोरी केले आहेत.
त्यामध्ये मोती चौक येथे मिठाई खरेदी करण्यासाठी गेलेला राजेंद्र रावबा शिंदे (वय 62, रा. जकातवाडी) यांच्या खिशातील 10 हजार 999 रुपयांचा मोटारोला कंपनीचा मोबाईल चोरीला गेला. एसटी स्टॅण्डसमोरीला भाजी मंडईतून विवेक महेंद्र मोरे (वय 32, रा. स्वामी विवेकानंदनगर मोळाचा ओढा) याचा भाजी खरेदी करताना 17 हजार 999 रुपयांचा मोबाईल चोरीला गेला.
पोवई नाका ते एसटी स्टॅण्ड जाणाऱ्या रस्त्यावर निलेश पेपर मार्ट नावाच्या दुकानासमोर दि. 31 राजी सकाळी 9.50 वाजता संतोष चंद्रकांत बागल (वय 44, रा. शाहुनगर) यांच्या भाजीच्या पिशवीत ठेवलेला 25 हजार रुपयांचा ओपोके 12 एक्स मॉडेलचा मोबाईल , दीपक शंकर निकम (वय 43, रा. यशवंत बंगलो, गणेश कॉलनी सदरबाजार) 26 हजार रुपयांचा मेगा ब्लू वन प्लस, जुना मोटर स्टॅण्ड भाजी मंडई येथे दि. 31 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मोती चौक येथे रामचंद्र विठ्ठल अवकिरे (वय 58, माजी सैनिक, रा. चिंतामणी कॉलनी शाहुपूरी) यांच्या खिशातील 7 हजार रुपयांचा वन प्लस आदी लोकांचे मोबाईल चोरुन नेले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात हे भाजीपाला खरेदीला आलेल्यांचे मोबाईल चोरीला गेल्याने भितीचे वातावरण आहे. हे सातारा शहर आणि शाहुपूरी पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.









