बाळासाहेबांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर; भाजप तिसऱ्या क्रमांकावर; जिल्ह्यातील राजकारण निघाले ढवळून; अनेक ठिकाणी सत्तांतर
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीपैकी 317 ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यातील 58 ग्रामपंचायती बिन विरोध झाल्या होत्या. 259 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. निकालाने पुन्हा एकदा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचेच प्रभुत्व दिसून आले आहे. अनेक ठिकाणी सत्ता बदल झाले आहेत. भाजपकडून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला आहे
सातारा जिल्हा
एकूण ग्रामपंचायती 318 पैकी भाजप 98,
भाजप +शिंदे गट 32,
शिंदे गट 69,
एकूण भाजप,शिंदे गट युती 198,
राष्ट्रवादी 78,
काँग्रेस 7,
ठाकरे गट 7,
एकूण महविकास आघाडी 92,
अन्य 28, असे सांगितले.