सातारा,प्रतिनिधी
Satara News : राष्ट्रवादीमध्ये उभी फूड पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडु लागल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने हे अजित पवार यांच्या गोटात गेले आहेत. सुनील माने यांनी अजित दादांच्या समर्थनार्थ शुभेच्छा देणारे फलक रहिमतपूर येथे लावले आहेत. त्यामुळे सुनील माने यांनी शरद पवार यांची साथ सोडली असल्याची चर्चा रंगली आहे.









