Satara Gram Panchayat Election Result 2022 live : सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीसाठी निवडणूका लागल्या होत्या.यातील 60 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तर 259 ग्रामपंचायतीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. 259 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 4 हजार 542 उमेदवार उभे होते. रविवारी झालेल्या या मतदानादिवशी सुमारे चार लाख पन्नास हजार मतदारांपैकी तीन लाख 55 हजार 254 मतदारांनी हक्क बजावला होता.साताऱ्यात कोणता गट बाजी मारणार जाणून घ्या तरूण भारत या वेबसाईटवरुन.
कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय झाला.
कराड ग्रामपंचायत निकाल
मनव /येळगावात उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम.
दुशेरे आणे / भाजपाच्या डॉ अतुल भोसले विजयी
हिंगनोळी /हेळगाव पाडळी/अंतवडी /राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम.
कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल
सुपने गावात गड आला पण सिह गेला आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा 4 जागांवर विजय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवला.
-भाजपा, कॉग्रेसला धक्का
तारुख ग्रामपंचायत अपक्ष सरपंच विजयी
-चोरजवाडी ग्रामपंचायत तटस्थ गटाकडे तर,
-घोलपवाडी ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात
-वनवासमाची ग्रामपंचायत स्थानिक आघाडीकडे
शंभूराज देसाई गटाला मोठा धक्का
पाटण तालुक्यातील मारुल ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे
सातारा तालुक्यातील क्षेत्र माऊली गावात शिंदे गट विजयी.तर
शशिकांत शिंदे गटाचा पराभव.
पाटण तालुक्यातील निवकनेत राष्ट्रवादी सर्व उमेदवार विजयी
सरपंच देसाई गट.
सातारा तालुका
सातारा तालुक्यातील काशीळ ग्रामपंचायतीत सत्तांतर
भाजप विजयी तर राष्ट्रवादीचा पराभव…
कोरेगांव तालुक्यातील रामोशीवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे.
माण तालुका
महिमानगड ग्रामपंचायत शिवसेनेकडे -शिंदे गट
धूळदेव ग्रामपंचायत भाजपकडे
देगाव ग्रामपंचायत ४६५३ एकूण मतदान
सरपंचपदी वैशाली साळुंखे ,शिंदे गट विजयी
महाबळेशवर ग्रामपंचायत निकाल
३ पैकी २ जागा शिंदे गटाकडे
पाटण तालुका
पाटण तालुक्यातील नाटोशी देसाई गटाकडे सत्ता कायम.
पाटण तालुक्यातील म्हावशी राष्ट्रवादी कडे
–माळेची वाडी ग्रामपंचायत निवडणूक निकाल
अरुण कापसे विजयी, २५७ मते
विशाल कापसे, ९१ मते-
अपशिंगे ग्रामपंचायत निवडणूक भाजप गटाकडे
तुषार निकम यांना ९१२ मते – भाजप
संतोष निकम ८३२ – राष्ट्रवादी
महाबळेश्वर तालुका
-मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील दोन निकाल हाती
-मुख्यमंत्र्यांच्या गटाचा झेंडा फडकला
महाबळेश्वरचा लाखवड ग्रामपंचायतीत एकनाथ शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंचपदी विजयी
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील गटाला धक्का
महाबळेश्वर तालुक्यातील वेंगळ ग्रामपंचायती वर एकनाथ शिंदे गटाच्या शोभा संकपाळ सरपंच विजयी…
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









