अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 20 एप्रिल 2022, दुपारी 12.45
● मंगळवारच्या अहवालात एकही बाधित नाही
● मंगळवारी 146 जणांचे स्वॅब तपासणी
● केवळ 1 सक्रीय रुग्ण
सातारा / प्रतिनिधी :
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकही रूग्ण बाधित आलेला नाही. एप्रिल महिन्यात एकही रुग्ण न आढळण्याची ही सातवी वेळ आहे. केवळ एक रुग्ण सक्रीय आहे.
सर्व तालुक्यांची कोरोनामुक्ती
एप्रिल महिन्याच्या संसर्ग पूर्णपणे थांबला असून अकरावी तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रीय रुग्ण केवळ एक असून जिल्हा पूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे.
रिकव्हरी रेट 97.36 टक्के
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. रिकव्हरी रेट 97.36 टक्के आहे. तर बाधित वाढीची टक्केवारी शून्यावर आली आहे.
बुधवारी
नमुने-146
बाधित-00
मृत्यू-00
सक्रिय-01
मंगळवारपर्यंत
नमुने-25,76,164
बाधित-2,79,227
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,850









