अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवारी 15 एप्रिल 2022, स. 11.45
● चार दिवसात एकही नवा रूग्ण नाही
● चाचण्यांची संख्याही घटली
● दिलासादायक चित्र
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात अडीच वर्षात पहिल्यांदाच कोरोना रूग्ण संख्या शून्यावर असल्याचा नवा विक्रम झाला आहे. गेल्या चार दिवसात सलग शून्यावर असून एकही नवा रूग्ण नाही. संशयितांच्या चाचण्यांची संख्याही घटली असून, ती 115 वर आली आहे.
संशयितांच्या चाचण्यांचा आलेखही घसरला
जिल्ह्यात सध्या वेगवेगळे उत्सव सुरू असतानाच सलग चार दिवसात एकही नाव रूग्ण आढळलेला नाही. संशयितांच्या चाचण्यांची संख्या अपवाद वगळता गत पंधरा दिवसात दोनशेवर होती. शुक्रवारी आलेल्या अहवालात चाचण्यांची संख्या 115 वर पोहचली आहे. चाचण्यांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे.
लसीकरणाचा नवा आराखडा
कोरोना रूग्णसंख्या अल्प झाली असली तरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नव्याने नियोजन करत तालुकानिहाय बैठका घेतल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि बुस्टर डोससाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी
नमुने-115
बाधित-00
मृत्यू-00
सक्रिय-04
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,75,267
बाधित-2,79,223
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,841









