सातारा/प्रतिनिधी
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराला यवतेश्वरपासून ते पठारापर्यंत अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे. प्रत्येकवेळेस कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते किंवा किरकोळ कारवाई केली जाते त्यामुळे हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यात यावा. याप्रकरणी जो राजकीय हस्तक्षेप होत आहे तो त्वरित थांबला पाहिजे, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने देऊन मागणी केली होती. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना लाईट कनेक्शन कसे दिले. बांधकाम करण्यासाठी परवानगी कशी मिळाली या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सामजिक कार्यकर्त्यांकडून निवेदने देण्यात आली आहेत. याची दखल घेऊन आज जिल्हाधिकारी रूचेश जयवांशी यांनी या भागाची पाहणी केली.
पाहणी नंतर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी, आम्ही पाहणी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या आहेत, तरीपण अजून अभ्यास करून योग्य ती कारवाई होईल. तहसीलदारांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे ते यावेळी म्हणाले.