१ ते ५ जून अखेर कझाकिस्तान येथे होणार स्पर्धा
औंध प्रतिनिधी
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने अलमट्टी-कझाकिस्तान येथे होणाऱ्या जागतिक नामांकन कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांची निवड केली आहे. ही स्पर्धा १ ते ५ जून अखेर होणार आहे.
प्रा. गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी जागतिक कुस्ती स्पर्धा, आशियाई स्पर्धा, आँलम्पिक पात्रता स्पर्धा अशा ४६ हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि १00 पेक्षा जास्त राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, संपत साळुंखे, ललित लांडगे कार्यकारणीचे सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.