राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्याच विस्तारात शंभुराज देसाई यांना मंत्री पद; पाटण विधानसभा मतदारसंघात जल्लोष…!
नवारस्ता / प्रतिनिधी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नंतर प्रदीर्घ कालावधी नंतर म्हणजे सुमारे ४० ते ४२ वर्षानंतर पाटण तालुक्यातील देसाई घराण्यात आमदार शंभुराज देसाई यांच्या रूपाने पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्यामुळे या घराण्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याचे दिसत आहे. मंत्री देसाई यांना मिळालेल्या मंत्रिपदाचे पाटण मतदारसंघात फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिराज्य गाजविले.राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याची जबाबदारी सांभाळून राज्याला नवी दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.त्यामुळे पाटण तालुक्यातील देसाई घराण्यात ५० ते ८० च्या दशकापर्यंत सुमारे २० ते २५ वर्षे राज्याची महत्वाची मंत्री पदे जसनतेची अखंडित सेवा करीत होती.मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निधनांनंतर देसाई घराण्यातील मंत्री पदाची परंपरा खंडित झाली ती तब्बल ४० ते ४२ वर्षानंतर राज्यातील शिवसेना भाजप सरकार मधील मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदशनखाली आमदार शंभूराज देसाई यांना मिळाली आहे.








