10 सप्टेंबर रोजी एका जमावाने धार्मिक स्थळावर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये पुसेसावळी येथील मौलवी लियाकत शिकलगार। यांचा इंजिनियर असणारा मुलगा नुरल हसन वय 30 याचा या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 14 जण जखमी झाले होते. यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यामध्ये काल पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिकलगार कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं.
साताऱ्यातील पुसेसावळी येथे एका गटाने केलेल्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी तरुणाची पत्नी, आई यांची विचारपूस उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. पुसेसावळी येथील सरपंच आणि गावकऱ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.