सातारा / विशाल कदम :
कास पुष्प पठाराचे वाढते महत्व कास धरणाची वाढलेली उंची या बाबी लक्षात घेऊन सातारच्या विकास आराखड्यात सातारा शहरातून बायपास असावा असा प्रस्ताव नमूद केला होता. त्यास व कास रस्त्याच्या लांबीकरणाला महाराष्ट्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. रस्त्यालाही नंबर मिळाला आहे तसा शासनाचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. त्यामुळे इकडे जाणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. दोन्ही नेत्यांचे प्रयत्न यासाठी होते.
सातारा शहराचा विकास आराखडा गेल्या काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये बायपास रोडची नोंदही झालेली होती. तसा प्रस्ताव होईल सातारा नगरपालिकेकडून शासनाकडे सादर झालेला आहे. दरम्यान कास धरणाची वाढलेली उंची, कास पुष्प पठाराकडे पर्यटकांची होणारी दररोज गर्दी. त्यामुळे कास रोडवर व सातारा शहरात समर्थ मंदिर, बोगदा, राजवाडा या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पालिका प्रशासनाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी विकास आराखड्यात बायपास रस्त्याची स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार मागणी केली. त्यातच खासदार श्री. छ. उदयनराजे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याकडे लक्ष घातल्याने कास रस्त्यापासून ते बायपास रस्त्याचा प्रश्न शासन दरबारी कागदावर आलेला आहे. त्यानुसार शासनाने दि. 2 रोजी अद्यादेश काढला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी विनंती केल्याप्रमाणे सातारा जिह्यातील सातारा तालुक्यातील कास तलावाच्या भिंतीची उची वाढविल्याने सातारा–कास–बामणोली–गोगवे– तापोळा–महाबळेश्वर (प्रमुख जिल्हा मार्ग-59) या रस्त्यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग-26 ते कासाणी फाटा ते घाटाई देवी रस्ता ते प्रमुख जिल्हा मार्ग 26 रस्ता (इजिमा क्र. 59) हा 8.00 कि.मी. लांबीचा रस्ता दर्जोन्नत करुन प्रजिमा क्र. 26 मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा शासन निर्णय संदर्भाधिन क्र. (2) अन्वये निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये त्यावेळी घाटाई देवी फाटा, कास पुष्प पठार, कास धरण भिंत अशी एकूण 4 कि. मी. लांबी प्रजिमा 26 च्या एकूण लांबीमधून वगळणे आवश्यक होते. तथापि ही (घाटाई देवी फाटा, कास पुष्प पठार, कास धरण भिंत अशी एकूण 4 कि. मी.) लांबी न वगळता रस्त्याच्या मूळ लांबीमध्ये 8 कि. मी. ने वाढ होऊन एकूण 108/850 कि. मी. इतकी करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा नगरपालिका यांच्यामार्फत त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जागेमध्ये 1200 मी. लांबीचे व 12 मी. रुंदीचे बाह्यवळण तयार करण्यात आले आहे. या बाह्यवळण पाण्याखाली जाणाऱ्या लांबीच्या वरील बाजूने जात आहे. नगरपालिकेकडून ही लांबी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले कास पठार येथून बामणोली, तापोळा येथे जाण्याकरिता नजिकची असल्याने सा. बां. उपविभाग सातारा यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सातारा यांनी सातारा जिह्यातील सातारा तालुक्यातील रा.म.मा.क्र.4 संभाजीनगर (सातारा) जगतापवाडी, पॅरेंट्स स्कूल ते बोगदा (सातारा) कि.मी. 5.00 लांबीचा समावेश प्रजिमा क्र. 23 मध्ये करुन घाटाईदेवी फाटा, कास पुष्प पठार, कास तलाव ते कास तलाव ते कास तलाव भिंत एकूण 4.00 कि.मी. लांबी प्रजिमा क्र. 26 च्या लांबीमधून कमी करण्याबाबत शासनास शिफारस केलेली आहे. तसेच नगरपालिका सातारा यांनी या रस्त्याबाबत मागणी केलेली आहे. या रस्त्यांवरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांचा होणारा वापर तसेच पालिकेची मागणी विचारात घेता अवर्गीकृत लांबी, अस्तित्वातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक– 26 मध्ये समाविष्ट करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तो प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-26 मध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.
सातारा नगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या 5 कि.मी. लांबीचा नागरी अवर्गीकृत रस्ता (रा.म.मा.क्र.4 संभाजीनगर (सातारा)-जगतापवाडी–पेरेंटस स्कुल–बोगदा (सातारा) प्र.जि.मा.26 मध्ये समावेश केल्यानंतर अस्तित्वातील प्र.जि.मा. 26 रस्त्याच्या एकूण लांबीत 5.00 कि.मी. ने वाढ होईल व घाटाईदेवी फाटा, कास पृष्प पठार, कास तलाव ते कास तलाव भिंत एकूण लांबी 4.00 कि.मी. ही लांबी प्र.जि.मा. 26 च्या लांबीमधून कमी होईल. त्यानंतर, (1) प्र.जि.मा.26 ची एकूण लांबी होऊन (108/850 + 5/00 = 113/850 – 4/00 = 109.850) इतकी होईल. प्र.जि.मा.26 चे नवीन नामाभिधान– रा.म.मा.क्र.4 संभाजीनगर (सातारा), जगतापवाडी, पेरेंटस स्कुल, बोगदा (सातारा), यवतेश्वर, पेट्री, घाटाई देवी, फाटा घाटाई देवी, कास, बामणोली, गोगवे, तापोळा, महाबळेश्वर रस्ता प्र.जि.मा.26 कि.मी.0/00 ते 109/850 असे होईल. घाटाईदेवी फाटा, कास पृष्प पठार, कास तलाव ते कास तलाव भिंत एकूण लांबी 4 कि.मी. या लांबीस (प्र.जि.मा.26-अ) असे संबोधण्यात यावे. परिणामी रस्ते विकास योजना 2001-2021 मधील, सातारा जिह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत 1 कि.मी. ने वाढ होवून एकूण लांबी (3806.800 + 1.00) म्हणजेच 3807.800 कि.मी. इतकी होईल असे नमूद केले आहे.








