सातारा :
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सातारा शहरात नवे कोरे तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबर वाहुन गेल्याच्या घटना काही ठिकाणी शहरात घडल्या आहेत. जुन्या रस्त्यांना असलेले खड्डे मोठे झाले आहेत. खराब रस्त्यांची तर आणखी बिकट परिस्थिती केली असून पावसाने रस्त्याची सगळी दाणादाण केली आहे. राजवाडा येथे बसस्थानकाच्या समोरचे दृश्य पाहून सातारा शहराचे विदारक चित्र पावसाने कसे केले हे लगेच दृष्टीस पडत आहे. त्याचबरोबर करंजे भागातील भोसले मळा येथील नुकतेच टाकलेल्या डांबराला चिरा पडल्या आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे प्रमाण सातारा शहरात सुरु आहे. आधी सातारा शहर हे डोंगर उतारावर बसवलेले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कधीही साठून राहत नाही. आलेले पाणी लगेच बाहून जाते. त्याचाच परिणाम शहरातील रस्त्यावर होतो. ज्या रस्त्याच्या कडेने नाले होते. तेही प्लॉ स्टिकच्या बाटल्यांनी तुंबले गेले. काही ठिकाणी अजूनही गटर रस्त्यावरून वहात आहे. चॉदणी चौकात हॉटेल कल्पनाच्या बाजूला गटर तुंबले आहे. गेली पाच दिवस सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही तुंबातुंबी निघाली नाही. त्यामुळे गटरचे पाणी राजवाडा बसस्थानकाच्या समोरुन आराम हॉटेलच्या समोर जात आहे. त्याचबरोबर शहर पोलीस ठाण्याच्या पाठीमागील रस्त्याला तर ओघळीचे रुपांतर आले आहे. अगदी पालिकेपर्यंत एका बाजूने हा रस्ता आहे की नाही अशी परिस्थिती बनली आहे. काही ठिकाणी पावसाने रस्त्यांबर खडीदगडे आलेले दिसतात. सातारा कोरेगाव रस्त्यावर गुरुदत्त कॉलनीच्या समोरच भला मोठा खड्डा पडला आहे. भोसले मळ्यात करण्यात आलेल्या रस्त्याचे डांबराला भेगा पावसामुळे पडलेल्या आहेत. शाहुपुरीत तर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे.








