सातारा प्रतिनिधी
सदरबाजार मध्ये दुपारी फटाके फुटल्या आवाज झाल्याने कुतुहूल म्हणून चर्चा झाली ती नेमका कोणता नेता आला येथे. जेव्हा नागरिकांना समजले की रिपाइंच्या आठवले गटाचे युवा कार्यकर्ते प्रतिकभाई गायकवाड यांनी खड्डय़ाचा वाढदिवस केक कापून बिर्याणी पार्टी देवून साजरा करण्यात आला. त्यांच्या या हटके आंदोलनाची चर्चा दिवसभर खुमासदारपणे सातारा शहरात सुरू होती. पालिकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
रिपाइंच्या आठवले गटाचे युवा नेते प्रतिकभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रोहित गायकवाड, विक्रम साठे, सचिन पोळ, सद्दाम शेख, गौरव जगताप, आकाश पाटोळे, अजय धनवे, गणेश शेलार, सागर चव्हाण, रोहित क्षीरसागर, श्रीराम गायकवाड, नितीन लबाडे, योगेश शेडगे, निळू पवार, अजय गायकवाड, वसीम शेख, सुमित कांबळे, विनोद पवार आदी सहभागी झाले होते. त्यांनी कोयना सोसायटीतील चौकात पालिकाच्या हद्दीत नव्याने समाविष्ट होवूनही गेली दीड वर्ष पडलेले खड्डे पालिकेकडून बुजवले गेले नसल्याने अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. प्रतिकभाई गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते दुपारी खड्डय़ाजवळ येताच त्यांचे फटाके फाडून स्वागत करण्यात आले. खड्डय़ाच्या जवळ पहिल्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्याच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर त्या खड्डय़ाजवळ दादाज बिर्याणी येथून आणलेल्या बियार्णी पंगत बसवण्यात आली. सगळे कार्यकर्त्यांनी खड्डय़ा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
खड्डे मुजवले नाही तर पालिकाया विरोधात तीव्र आंदोलन करणार
आमच्या कोयना सोसायटीचा परिसर हा पालिकेच्या हद्दीत आला आहे. पूर्वी खेड ग्रामपांयतीच्या हद्दीत होता. जर पालिकेच्या हद्दीत येवूनही पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवले जात नसतील, नागरिकांना त्या खड्डय़ातून जावे लागत असेल तर या प्रशासनाच्या विरोधात आला लक्षवेधी खड्डय़ा वाढदिवस आम्ही साजरा करून आंदोलन केले आहे. पुढे यापेक्षाही तीव्र आणि हटके आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रतिकभाई गायकवाड यांनी दिला आहे.