वाई : प्रतिनिधी
भुईंजमध्ये अस्तित्वाच्या लढाईत भाजपचे मदन भोसले यांनी गड राखण्यात यश मिळवले. तर इतर सहा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटिल यांनी वर्चस्व राखले. पांडे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवून आणत राष्ट्रवादीने सत्ता ताब्यात घेतली. तर बोपर्डी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने १०/० अशी एक हाती सत्ता राखली आहे. तालुक्यातील सात ग्रामपंचायतच्या मतमोजणीची प्रक्रिया आज तहसिल कार्यालयात शांततेत पार पडली.
भुईंजची सत्ता ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले. ईतर ६ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. भुईंजमध्ये ९ भाजपा तर ६ राष्ट्रवादी असे बलाबल झाले आहे. पांडे येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या ताब्यातून सत्ता राष्ट्रवादीने ताब्यात घेतली असून किरण जाधव यांनी केलेल्या मोर्चेबांधणीला यश आले. येथे ९ राष्ट्रवादी तर ईतर १ असे बलाबल आहे. किकली येथे राष्ट्रवादी ८ तर इतर २, गोवेदिगर राष्ट्रवादी ५ तर ईतर ३, बोपर्डी येथे राष्ट्रवादी १० तर इतर ०, कवठे येथे राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्राम विकास पँनेल ७ तर ईतर ४ असे बलाबल झाले आहे.
निवडणुकीत विजय झालेले उमेदवार पुढील प्रमाणे भुईंज ग्रामपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी विजय शंकर वेळे हे विजयी झाले. तर सदस्यपदी शुभम मनोज पवार ( बिनविरोध), सौ नंदा भीमराव कांबळे, प्राजक्ता विनय जाधव, नारायण बाळकृष्ण नलावडे, रूपाली गणेश खरे, दिपाली मदन भोसले, ईशान गजानन भोसले, नीलम गणेश रोकडे, रमेश विष्णू दगडे, गजानन तानाबा भोसले, विद्या मदन कुचेकर, अमित शंकर लोखंडे, भरत पांडुरंग भोसले, निशिगंधा संतोष भोसले, चेतन शिवाजी दाभाडे (बिनविरोध), पूजा सुनील जांभळे, विमल दीपक जाधव हे विजयी झाले आहेत.
कवठे ग्रामपंचायत सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी श्रीमती मंदाकिनी शंकर पोळ या विजयी झाल्या आहेत. तर सदस्य पदी शिवाजी धोंडीबा ढेरे, ओंकार शिवाजी शिंदे, नम्रता संतोष ढेरे, मुरलीधर गणपत पोळ, कल्पना दत्तात्रय करपे, सुनीता दिलीप पोळ, राजेंद्र कोंडीबा पोळ, लक्ष्मी मोहन टिके, लक्ष्मण शिवदास गायकवाड, गौरी प्रदीप ढेरे, सुषमा राजेंद्र ढेरे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
बोपर्डी ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी शंकर शिवराम गाढवे हे विजयी झाले आहेत. तर सदस्यपदी रणजीत आनंदा गाढवे, दिपाली ज्ञानेश्वर घाटे, भारती संभाजी पवार, सुनील बबन भिंताडे, सिंधू गणेश गाढवे, सुनीता सतीश गाढवे, आनंदा कुसाजी गुरव, ऋषिकेश सुरेश गाढवे, ज्योती मनोज सातपुते हे उमेदवार विजयी झाले आहेत.
पांडे ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी सौ. चेतना किरण जाधव या विजयी झाले आहेत. तर सदस्यपदी रेखा शामराव चव्हाण, स्वप्निल महादेव यादव, अजित वसंत गोळे, शितल राजेंद्र जाधव, संगीता मनोहर खराडे, प्रवीण मानसिंग जाधव, छाया संतोष मोरे, नम्रता अजित जाधव, संदीप बाबुराव जाधव हे उमेदवार विजयी झाले आहेत.
किकली ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी प्रसाद श्रीकांत गुरव हे विजयी झाले आहेत. तर सदस्य पदी शुभांगी निलेश बाबर, दीपक साहेबराव बाबर, संभाजी यशवंत बाबर, पायल रोहित वाघमारे, संतोषी रवींद्र महामुनी, संतोष शंकर बाबर, रेखा चंद्रकांत बाबर, मनीषा दत्तात्रय बाबर, कुमार शहाजीराव बाबर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
गोविंदगर ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव असलेल्या सरपंच पदी आम्रपाली सुभाष चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर सदस्य पदी ओमकार रवींद्र मांढरे, प्रियांका प्रशांत सणस, शिल्पा विलास पिसाळ, साहेबराव कोंडीबा पिसाळ, सुवर्णा विलीन गायकवाड (बिनविरोध), प्रदीप सिताराम सनस, द्रौपदी शिवाजी शेवते हे उमेदवार विजयी झाले आहेत.
काळंगवाडी ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीवसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी स्वप्नाली गणेश मोहोळकर या विजयी झाल्या आहेत. तर सदस्यपदी शिवाजी रामचंद्र वजरीनकर, सुनिता नामदेव कदम, रत्नाबाई बजरंग काळंगे, लालसिंग शिवराम पवार, विजया प्रवीण शिंदे, अजय अंकुश निकम, रंजना सतीश पवार हे उमेदवार विजयी झाले आहेत









