पोलिसांनी महाराष्ट्र शासनाची पाटी केली जप्त, आनेवाडी टोल नाक्यावर कारवाई
कुडाळ/प्रतिनिधी
सातारा पुणे महामार्गावरील असणाऱ्या आणेवाडी टोल नाक्यावर सातारा आरटीओ यांची वाहन तपासणी मोहीम सुरू असतानाच आरटीओ सातारा अधिकारी इंगळे यांनी तपासणीच्या दरम्यान एक खाजगी टुरिस्ट पासिंगची गाडी महाराष्ट्र शासनाचा अनधिकृत बोर्ड लावून मुंबईच्या दिशेने जात असताना वाहतूक पोलिसांनी गाडीला अडवून तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एमएमआरडीच्या मुंबई येथील महिला अधिकाऱ्याचा पती बिनधास्त महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून प्रवास करत असतानाची बाब तपासात समोर आली यावरूनच सातारा आरटीओ इंगळे यांनी महाराष्ट्र शासनाचा बोर्ड जप्त करत टुरिस्ट पासिंगच्या गाडीला दीड हजार रुपयांचा दंड केला.
सध्या महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. परंतु ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. काल आणेवाडी टोलनाक्यावर एमएमआरडी च्या मुंबई येथील एका महिला अधिकाऱ्याच्या पतीने टुरिस्ट पासिंग गाडीवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून आपल्या पत्नीच्या पदाचा गैरवापर केला असल्याची खळबळजळत बाब आरटीओने उघडकीस आणली. यांनतर त्या गाडीला दीड हजार रुपयांचा दंड करत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड जप्त केला आहे. त्यामुळे आता टोल नाक्यावर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्यांची चांगलीच कसून तपासणी केली जात असल्याचेही सातारा आरटीओचे अधिकारी इंगळे यांनी सांगितले.









