Satara Accident : लोणंद रस्त्यावरती वडूथ गावच्या हद्दीत बुधवारी पहाटे टाटा कंपनीच्या ट्रकला अपघात झाला. यामध्ये ट्रकमध्ये असणारे कुरकुरे आणि बिंगो हे खाद्यपदार्थाचे बॉक्स जळून खाक झाले. सुदैवाने या गाडीचा ड्राईव्हर आणि क्लिनर यांना काही दुखापत झाली नाही. मात्र चालकाने निष्काळजीने वाहन चालवल्याने वाहनचालक तुषार भास्कर म्हैसकर रा. सांगली (वय- २९) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सातारा लोणंद मार्गावरती टाटा कंपनीचा ट्रक हा आयटीसी कंपनीचे कुरकुरे आणि बिंगो हे खाद्यपदार्थाचे बॉक्स घेऊन रांजणगाव वरुन कोल्हापूरला निघाला होता. तो ट्रक वडूथ येथे आला असता येथील चैतन्य मेडीकल समोर हा भीषण अपघात घडला. मेडीकल समोरील लाईटचा पोल ट्रकच्या मागील लोखंडी हुकामध्ये अडकला व वायरींसह गाडी बरोबर वडत गेला. यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन या गाडीमधील सर्व माल जळून खाक झाला. सुदैवाने या गाडीचा ड्राईव्हर आणि क्लिनर यांना काही दुखापत झाली नाही. या सर्व प्रकरणामध्ये वडूथ गावच्या सरपंचासह येथील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करुन पुढील होणारा अनर्थ टाळला. मात्र चालकाने निष्काळजीने वाहन चालवल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
Previous Articleसुशोभिकरण केल्याने नवीन ठिकाणी टाकला कचरा
Next Article भाग्योदय सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत









