वाई : महिन्याला 80 हजार रुपये ट्रव्हल्सला भाडे देतो असे सांगून वाईला ट्रव्हल्स आणली. परंतु त्याचे पैसेही दिले नाहीत. गाडीचे नुकसानही केले. तसेच सतत दिलेल्या मानसिक, शारिरीक त्रासामुळे विजेंद्र मारुती शिंदे (वय 37, रा. जेजुरीकर कॉलनी वाई) याने आत्महत्या केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी अद्याप तिघांना अटक केलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद मारुत शिंदे (रा. शिंदेवाडी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याचा भाऊ विजेंद्र हा सिद्धनाथवाडीतील जेजुरीकर कॉलनीत रहात होता. तेथे त्यांची ट्रव्हल्स दर महिना 80 हजार रुपये भाडे देतो असे सांगून अविनाश मोरे ( रा. एसटी स्टॅण्डसमोर सिद्धनाथवाडी वाई), विशाल जानवार, सुरज सोनवणे (दोघे रा. शिर्डी), प्रमोद रमेशलाल वेदमुथा(अहमदनगर) चौघांनी घेतली होती. ठरवलेल्या भाड्य़ाची रक्कम वेदमुथा याने दिलेली नाही. गुपचुपपणे चौघांनी विजेंद्रची ट्रक्हल्स वाई येथे आणून लावली. ट्रव्हल्समधील 34 चादर, एलसीडी टीव्ही व गाडीचे सहा टायर काढून घेतले आहेत. विजेंद्रला चौघांनी आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या सततच्या त्रासास कंटाळून आलेल्या नैराश्येमध्ये आत्महत्या केली. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार हे करत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









