वळसंग , वार्ताहर
जत तालुक्यातील मुचंडी येथील श्री साई ट्रेडर्स दुकानाला सकाळी 7.30 वाजता मालवाहतूक ट्रक(NL- 01,AG-5612) ने धडक दिल्याने दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.तर यात दुकानाचे मालक रोहिदास शिवशरण (वय -42) हे गंभीर जखमी झाले. त्यांना जत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी विजापूर गुहागर या रस्त्याशेजारी मुचंडी येथील कोट्टलगी क्रॉस येथे रोहिदास शिवशरण यांचे घर बांधकाम साहित्य विक्रीचे साई ट्रेडर्स हे दुकान आहे . ते मुचंडीचे पोलीस पाटील असून सकाळी साडेसात वाजता आपल्या दुकानात बसले होते. जतकडून विजापूरकडे भरधाव वेगाने जाणारी मालवाहतूक गाडीने दुकानाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुकान चक्काचूर झाले असून रोहिदास शिवशरण हे गंभीर जखमी झाले आहेत . दुकानातील खुर्ची खाली अडकल्याने ते वाचले आहेत. त्यांना जत येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मालवाहतूक गाडीच्या चालकाने आपली गाडी न थांबविता विजापूर रस्त्याने गाडी नेत असताना तिकोटो पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी मालवाहतूक गाडी जप्त केली आहे .या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाले असून पुढील तपास जत पोलीस कर्मचारी करीत आहेत.









