प्रवीण देसाई, कोल्हापूर
महसूल विभागाने संगणकीकृत केलेला सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका आता 22 भाषेत पाहायला मिळणार आहे.यामध्ये हिंदी,उर्दु, संस्कृत, कन्नड, मल्याळम, सिंधी, काश्मिरी नेपाळीसह विविध भाषांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या महाभूमी पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर याला सुरुवात झाली आहे.
राज्याच्या महसूल विभागाने सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड)संगणकीकृत केला आहे. डिजिटल स्वाक्षरीमध्ये असलेला सातबारा व मिळकत पत्रिका ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्रातील नागरिकांना उपलब्ध होत आहे. आता हे सातबारा व मिळकत पत्रिका 22 भाषांमध्ये भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टलवर उपलब्ध झाला आहे. ही सुविधा राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (एनआयसी)ने विकसित केली आहे. त्यासाठी पुणे येथील ‘सी-डय़ाक’ विकसित केलेल्या टूल चा वापर करण्यात आला आहे.
सातबारा इतर भाषांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलून सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे त्याचा लाभ अनेक बिगर मराठी भाषिक नागरिकांना होण्याची शक्यता आहे.
….या संकेतस्थळावर पाहता येणार सातबारा
बिगर मराठी भाषेतील सातबारा https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. बिगर मराठी भाषेतील सातबारा व मिळकत पत्रिका सध्या केवळ विनास्वाक्षरीत मोफत पाहण्यासाठी ‘ह्यु-ओन्ली’ सुविधे मधेच उपलब्ध आहे. त्यामुळे असे सातबारा किंवा मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरीत नसल्याने त्या कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा न्यायालयात स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच ग्राह्यही धरण्यात येणार नाहीत. परंतु तरीही बिगर मराठी भाषिक नागरिकांनात्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे.
….या भाषांमध्ये सातबारा
आता मराठी शिवाय इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, ओडिसी, तमिळ, तेलगु मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, आसामी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, डोगरी, बोडो, संथाली, सिंधी, काश्मिरी (देवनागरी) व काश्मिरी ( परसो अराबिक) या भाषांमध्ये सातबारा पाहायला मिळणार आहे.
एका भाषेतील सातबारा इतर भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत पहायला मिळावा, यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सातबारा आता 22 विविध भाषांमध्ये पहायला मिळणार आहे. यासाठी महाभूमी पोर्टलवर ही सुविधा उपबल्ध करुन देण्यात आली आहे.
-रामदास जगताप, माजी राज्य समन्वयक, डिजिटल सातबारा प्रकल्प
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









