सलमा आगा यांची कन्या
नायजेरियन संगीतकार रॅपर रेमा 12 मेपासून भारतात ‘रेमा कॅलम डाउन इंडिया’ची सुरुवात करणार आहे. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने कॉच्यूम डिझाइन केले आहेत. हा कार्यक्रम दिल्ली, मुंबई आणि हैदराबादमध्ये आयोजित होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री आणि गायिका जहरा एस. खान गायन करणार आहे.
रेमाची मी मोठी चाहती आहे, त्याच्या शोमध्ये भाग घेण्याची संधी माझ्यासाठी स्वप्नवत आहे. या शोमधील स्वत:च्या गायनाबद्दल अत्यंत उत्सुक असल्याचे जहराने म्हटले आहे. रेमाचे पूर्ण नाव डिवाइन इकुबोर असून तो एक नायजेरियन गायक, गीतकार अन् रॅपर आहे. त्याला ‘डुम्बी’ गीताकरता मोठी लोकप्रियता मिळाली होती. ‘काम डाउन’साठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.
तर जहरा एस. खान ही अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी आहे. जहराने अभिनेत्री म्हणून स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात ‘औरंगजेब’ या चित्रपटाद्वारे केली होती, परंतु त्यावेळी तिने साशा खान असे नाव धारण केले होते. ‘देसी कट्टे’ चित्रपटातही तिने अभिनय केला आहे. साशालाच आता जहरा एस. खान नावाने ओळखले जाते. साशाने ‘बेल बॉटम’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यासारख्या चित्रपटांकरता गायन केले आहे.









