प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव काही तासांवर आला असल्याने गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींचे रंगकाम पूर्ण होत आले असून मूर्तिशाळांमध्ये लगबग सुरू आहे. काही मूर्ती बाहेरच्या जिल्हय़ांमध्ये जाणार असल्याने त्या पूर्ण करण्यात मूर्तिकार दंग आहेत.
सार्वजनिक गणेशमूर्ती घडविणारे गाव म्हणून बेळगावची ओळख आहे. त्यामुळे शेकडो श्रीमूर्ती या परिसरात घडविल्या जात असतात. बेळगावमध्ये अनगोळ, वडगाव, बेळगाव तसेच ग्रामीण भागात गणेशमूर्ती तयार केल्या जातात. काही चार ते पाच महिन्यांच्या परिश्रमाने मूर्ती घडविण्यात आल्या आहेत.
या मूर्तींवर सोमवारी शेवटचा हात फिरविण्यात येत होता. काही मूर्तींचे रंगकाम शेवटच्या टप्प्यात होते. मंगळवारी व बुधवारी मंडळांचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन जाणार असल्याने लगबग सुरू आहे.









