उज्ज्वला नाईक उपसरपंच
वार्ताहर /मडकई
पुंडई पंचायतीच्या सरपंचपदी सर्वेश जल्मी यांची तर उज्ज्वला नाईक यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सरपंचपदासाठी सर्वेश जल्मी यांचे नाव पंचसदस्य संदीप जल्मी यांनी सुचवीले तर पंचसदस्य विश्वास फडते यांनी त्याला अनुमोदन दिले. उपसरपंच पदासाठी उज्ज्वला नाइं&क यांचे नाव पंचसदस्य मनिषा नाईक यांनी सुचवीले तर दिपाली गावडे यांनी अनुमोदन दिले. लिलेश गावडे यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले तर त्यांना पंचायत सचिव मयूर गावंस यांनी साहाय्य केले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सहकार्यांने पंचायतीच्या सर्व प्रभागाना विकासकामाबाबत योग्य न्याय दिला जाईल. प्रलंबित विकासकामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे सरपंच सर्वेश जल्मी यांनी सांगितले.









