आचरा प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरिय शालेय क्रिडा स्पर्धा ओरोस येथे पार पडल्या गोळाफेक या मैदानी खेळात गाऊडवाडी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सर्वेश आचरेकर याने प्रथम क्रमांक पटकवला या विद्यार्थ्यांला शाबासकीची थाप देण्यासाठी शाळेच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता . यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांच्या हस्ते सर्वेश यांचा सत्कार करून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात श्री नागवेकर यांनीही सर्वेश याला भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. यावेळी प्रा. शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे सदस्य श्री. जे. एम. फर्नांडिस, शालेय समिती अध्यक्ष सो, सेजल आचरेकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, बालवाडीच्या सेविका उपस्थित होते.यावेळी शुभेच्छा देताना सरपंच फर्नांडीस म्हणाले की मिळालेले यश हे कायम टिकविण्यासाठी सतत मेहनत घेतली पाहिजे यासाठी खेळात सातत्य ठेव. तुझ्या या यशामुळे गाऊडवाडी शाळा आणि आचरे गावचा नावलौकिक झाला आहे. यासाठी तुझे खूप-खूप अभिनंदन. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका सौ जोशी यांनी केले, आभार शिक्षिका सौ. बांगर बाई यांनी मानले.









