Sarthak Malvankar first in painting competition!
क्रीडा तपस्वी शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेचे केले होते आयोजन
क्रिडातपस्वी शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सार्थक मालवणकर ने पटकावले.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक दुर्वा अजित सावंत तर तृतीय क्रमांक रणवीत रांजणे , उत्तेजनार्थ हुनेरा बागवान बक्षीस पटकावले. सुमारे ४० स्पर्धेकांनी शिवउद्यान मध्ये चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. छायाचित्रकार अनिल भिसे यांनी क्रीडातपस्वी कै शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल भिसे यांनी रूपरेषा सांगितली.नगरपरिषद जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान गार्डनमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक यांना बक्षीस व प्रमाणपत्र व स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
छायाचित्रकार अनिल भिसे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकार अभिमन्यू लोंढे, क्रीडा प्रशिक्षक दिलीप वाडकर, अभिनेता सुधीर धुमे, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड संतोष सावंत, पत्रकार अनंत जाधव,पत्रकार हरिश्चंद्र पवार, संतोष परब,दिपक गावकर,सौ रिया भिसे, मारिया फर्नांडिस, सौ अक्षता मडगावकर, आनंद धोंड, संदेश पाटील, सदस्य बेंजामिन फर्नांडीस, अरुण भिसे, जतीन भिसे, हेमंत केसरकर,सागर कोरगावकर,अनिल कुडाळकर उपस्थित होते.अरूण भिसे,अनिल भिसे व सौ रिया भिसे यांनी विद्यार्थी,पालक व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बोलताना दिलीप वाडकर म्हणाले, क्रीडा तपस्वी कै शिवाजीराव भिसे सर यांनी विद्यार्थ्यांना घडविले. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे उपक्रम प्रेरणादायी होते. त्यांच्या पश्चात त्यांचे विद्यार्थी त्यांचा नावलौकिक बोलून दाखवतात. अनिल भिसे यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करून स्मरण केले आहे. त्याबद्दल कौतुक केले पाहिजे.पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले, क्रीडा तपस्वी कै भिसे सर यांचे जयंती दिनी स्मरण करण्यासाठी इयत्ता पहीली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अनिल भिसे मित्रमंडळाने आयोजित करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. या लहान मुलांच्या हातांना त्यामुळे चांगले वळण लागणार आहे. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. पालकांनी सुध्दा लहान वयातच मुलांना स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
सुत्रसंचलन सुधीर धुमे, मारिया फर्नांडिस तर आभार प्रदर्शन छायाचित्रकार अनिल भिसे यांनी केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









