सहाही ग्रामपंचायती भाजपकडे
सांखळी/प्रतिनिधी
राज्यात पंचायत निवडणूक2022 ला भाजपा ने एक वेगळी कमल केलीआणि संपूर्ण गोवाच भाजपमय होऊन गेला.आज सांखळी मतदारसंघात सहा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंचपदा साठी निवडणुका झाल्या होत्या त्यात
- वेळगे सरपंच सामंता कामत ,उपसरपंच दुर्गादास नाईक
- पाळी सरपंच शिवदास मुळगावकर, उपसरपंच गौरंगी परब,
- आमोणा -सरपंच कृष्णा गावस, उपसरपंच दिव्या सावंत
- कुडणे -राजन फाळकर,उपसरपंच … मळीक
- न्हावेली सरपंच कालिदास गावस उपसरपंच ऋतिका गावडे
- सुर्ला ःसरपंच विश्रांती सुर्लकर, उपसरपंच भोला खोडगीणकर
कुडणे -राजन फाळकर,उपसरपंच पूर्वा मळीक यांची बिनविरोध निवड झाली .त्यामुळे सांखळी मतदारसंघातिल सहा ही ग्रामपंचायती भाजपच्या ठरल्या मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सर्व सरपंच, उपसरपंच आणि पंचायत सदस्यांचे सांखळी भाजप कार्यालयात अभिनंदन केले.
मिळून मिसळून गावच्या विकासाची काम करा : मुख्यमंत्री
आपला गाव ही आपली जवाबदारी आहे.तेव्हा गावची विकास कामे करताना नागरिकांना विश्वसात घेणे आवश्यक आहे.संघटित राहून गावचा विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करा, माझे नेहमी सहकार्य मिळेल,फक्त विरोधाला विरोध न करता मिळून मिसळून गावच्या विकासाची काम करा.तसेच यंदा संगीत खुर्चीचे स्वप्न कोणीही पाहू नये असे मत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.आणि सर्वांचे अभिनंदन केले सुर्ला सरपंचपदी विश्रांती सुर्लकर उपसरपंच भोला खोडगीणकर बिनविरोध
डिचोली तालुक्मयातील सांखळी सुर्ला ग्रामपंचायत कार्यलयात सोमवारी सकाळी सरपंच, उपसरपंच पदाची निवड करण्यांत आली.यात सरपंचपदी विश्रांती सुर्लकर, उपसरपंचपदी भोला खोडगीणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सहिमा गावडे, सुचिता गावकर, सुभाष फोडेकर, दिनेश मडकईकर,शाणू सुर्लकर यांची उपस्थिती होती. जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी उपस्थित राहून सरपंच, उपसरपंच यांचे अभिनंदन केले.









