नागरिकांचे उपोषण गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मागे
कडेगांव प्रतिनिधी
खेराडे वांगी ता. कडेगांव येथील अज्ञात लोकांनी तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते. या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी खेराडे वांगी गावातील नागरिकांनी बुधवार पासून तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते.
तहसिल कार्यालयासमोर मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. या उपोषणास सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे, शिवसेना कडेगाव तालुका अध्यक्ष प्रदीप कदम, सचिन जगताप, चंद्रकात पाटील, आबासाहेब करांडे, संभाजी यादव,सतीश जाधव, राजाराम पवार, गणेश पवार, संग्राम घार्गे, किशोर मिसाळ यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा देऊन भिंत पाडणाऱ्या लोकांन वर चौकशी होवून कारवाई करण्यात संदर्भात निवेदने दिलेली होती.